पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

देवी ची आरती | दुर्गेमाता ची आरती

।। श्री ।। दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारीं ।। अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ।। वारीं वारीं जन्ममारणातें वारीं ।। हारी पडलों आता संकट निवारीं ।। १ ।। जयदेवी जयदेवी जय महिषासुरमथिनी ।। सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ।। जयदेवी जयदेवी    त्रिभुवनभुवनीं  पहातां तुजऐसी नाहीं ।। चारी श्रमले परंतु न बोलवे काहीं ।। साही विवाद करितां पडले प्रवाहीं ।। ते तूं भक्तांलागीं पावसि लवलाही ।। जय० ।। २ ।। प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा ।। क्लेशां पासुनि सोडवी तोडीं भवपाशा ।। अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।। नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ।। जय० ।। ३ ।।  

संध्याकाळचे श्लोक .... शुभम करोति 🙏

हात , पाय, तोंड  स्वच्छ धून पुसून देवघराची थोडी सफाई करावी । मग तेलाचा दिवा लावावा । उदबत्ती किंवा धूपबत्ती लावावी । देवघरातली घंटा वाजवून हा श्लोक म्हणावा ।  घरातले सगळे जण एकत्र येऊन श्लोक म्हटले कि तेचि वेगळीच मजा ।   शुभम करोति कल्याणम आरोग्यम सुख संपदा । शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते ।। १ ।। दीपज्योति परब्रम्ह दीपज्योर्तिजनार्दनः  । दिपो हरतु मे पापं संध्यादीप नमोस्तुते ।। २ ।। दिव्या दिव्या दीपत्कार कानीं कुंडले मोतीहार । दिव्याला पाहून नमस्कार ।। ३ ।। तिळाचे तेल कापसाची वात । दिवा जळो मध्यानरात । दिवा लावला देवांपाशी । उजेड पडला तुळशीपाशी । माझा नमस्कार देवाधिदेवा तुमच्या चरणांपाशी ।। ४ ।। सर्वलहानांनी मोठ्यांचे पाय शिऊन आशीर्वाद घ्यावा । मनात वेगळ्या स्फूर्ती चा संचार होतो ।   मनाचे श्लोक (१ ते १०) पण म्हणूशक्ता

१२ सूर्यनमस्कार आणि श्लोक ... घाला आणि स्मरण करा ...संपूर्ण विधी

सूर्यनमस्कार घालणे ही सूर्याची उपासना, शारीरिक बल व मनोबल, तसेच बुद्धी व तेज वाढवणारी असून नमस्कार रोज सकाळी स्नानानंतर पूर्वेकडे तोंड करून व तीर्थ प्राशन करण्यासाठी एका शुद्ध फुलपात्रात स्वच्छ पाणी सूर्यासमोर व आपल्या सन्मुख ठेवून सूर्य प्रसन्न व्हावा म्हणून घालावेत । १२ नमस्कार म्हणजे १ आवृत्ती । आपल्या शक्तीप्रमाणे एक, दोन व तीन आवृत्या घालाव्यात  । हात जोडून उभे राहून प्रत्येक वेळी पुढील नाममंत्र क्रमाने म्हणून एक-एक नमस्कार घालावा । १. ओम मित्राय नमः । २. ओम रवये नमः । ३. ओम सूर्याय नमः । ४. ओम भानवे नमः । ५. ओम खगाय नमः । ६. ओम पूष्णे  नमः । ७. ओम हिरण्यगर्भाय नमः । ८. ओम मरीचये नमः । ९. ओम आदित्याय नमः । १०. ओम सवित्रे नमः । ११. ओम अर्काय नमः । १२. ओम भास्कराय नमः । १ आवृत्ती झाल्यावर , सगळे १२ नमस्कार अशे म्हणा : मित्र - रवि -सूर्य - भानु - खग -पूष -हिरण्यगर्भ - मरिच्यादित्य- सवित्र अर्क  - भास्करेभ्यो नमो नमः ।। नमस्कार पूर्ण झाल्यानंतर , समोर ठेवलेल्या पात्रातील पाणी उजव्या (right hand ) हातावर संध्येतील पळीने घेऊन तीनदा प्राशन   करावे । त्यावेळी पुढील श्लोक म्हणावेत - आदित्