१२ सूर्यनमस्कार आणि श्लोक ... घाला आणि स्मरण करा ...संपूर्ण विधी

सूर्यनमस्कार घालणे ही सूर्याची उपासना, शारीरिक बल व मनोबल, तसेच बुद्धी व तेज वाढवणारी असून नमस्कार रोज सकाळी स्नानानंतर पूर्वेकडे तोंड करून व तीर्थ प्राशन करण्यासाठी एका शुद्ध फुलपात्रात स्वच्छ पाणी सूर्यासमोर व आपल्या सन्मुख ठेवून सूर्य प्रसन्न व्हावा म्हणून घालावेत ।

१२ नमस्कार म्हणजे १ आवृत्ती । आपल्या शक्तीप्रमाणे एक, दोन व तीन आवृत्या घालाव्यात  ।

हात जोडून उभे राहून प्रत्येक वेळी पुढील नाममंत्र क्रमाने म्हणून एक-एक नमस्कार घालावा ।

१. ओम मित्राय नमः ।

२. ओम रवये नमः ।

३. ओम सूर्याय नमः ।

४. ओम भानवे नमः ।

५. ओम खगाय नमः ।

६. ओम पूष्णे  नमः ।

७. ओम हिरण्यगर्भाय नमः ।

८. ओम मरीचये नमः ।

९. ओम आदित्याय नमः ।

१०. ओम सवित्रे नमः ।

११. ओम अर्काय नमः ।

१२. ओम भास्कराय नमः ।


१ आवृत्ती झाल्यावर , सगळे १२ नमस्कार अशे म्हणा :

मित्र - रवि -सूर्य - भानु - खग -पूष -हिरण्यगर्भ - मरिच्यादित्य- सवित्र अर्क  - भास्करेभ्यो नमो नमः ।।

नमस्कार पूर्ण झाल्यानंतर , समोर ठेवलेल्या पात्रातील पाणी उजव्या (right hand ) हातावर संध्येतील पळीने घेऊन तीनदा प्राशन  करावे । त्यावेळी पुढील श्लोक म्हणावेत -

आदित्यस्य नमस्कारन ये कुर्वन्ति दिने दिने । जन्मांतरसहस्त्रेषु दारिद्रयं नोपजायते ।। १ ।।

अकालमृत्यू -हरणं सर्वव्याधी विनाशानं । सूर्यपादोदकं तीर्थं जठरेधारयाम्यहम  ।। २ ।।

अनेन नमस्काराख्येन कर्मणा श्रीसवितृ सूर्यनारायणः प्रीयताम ।।

पात्रात उरलेले पाणी तुळशीला घालावे. घरातील सश्रद्ध लोकांना द्यावे .

टिप्पण्या

Popular

श्री हनुमान चालीसा

श्री बजरंग बाण

गुरुवंदन श्लोक